Sharad Pawar Resigns Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: "हा निर्णय कालच होणार होता मात्र...", अजित पवारांना होती पवारांच्या राजीनाम्याची कल्पना

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय आज कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत बसण्याचं आवाहन केलं.

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. परंतु देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता, असं अजित पवारांनी बोलताना सांगितलं आहे.

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावुक झाले. यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले होते.

पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून समितीच्या निर्णयानुसार पुढचा अध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची आणि निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या" अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT