Ajit Pawar on Dattatray Bharane Viral Video Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Ajit Pawar on Dattatray Bharane Viral Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि इंदापुरचे आमदार दत्ता भरणे यांचा शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि इंदापुरचे आमदार दत्ता भरणे यांचा शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून टीका होताना पाहायला मिळत असून याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दत्ता भरणे यांच्या व्हायरल व्हिडीओबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, त्या व्हिडीओनंतर मी दत्ता भरणे यांचं एक स्टेटमेंट पाहिलं आहे. ज्यामध्ये दत्ता भरणे म्हणाले की, मी तिथं राउंडसाठी गेलो होतो, तीथं असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या लोकांनी मारहाण केली असती ती होऊ नये म्हणून मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं. दत्ता भरणे यांचं म्हणणं आहे की, ते याबद्दल तक्रार देणार नाहीयेत, तसेच कोणाला तक्रार द्यायची असेल तर द्यावी, त्याबद्दल मी स्वतः जे असेल ते उत्तर वकिलामार्फत देतील असे अजित पवारांनी सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आज धाराशीवमध्ये चाकूने हल्ला झाल्याची, तसेच एक व्यक्ती मतदानादरम्यान दगावल्याची बातमी देखील समोर आली आहे. या बातम्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणाऱ्या आहेत, यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जवळपास ३५ वर्ष झाले मी निवडणुका लढवतोय. ३५ वर्षात असले प्रकार पाहायला मिळाले नव्हते. दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की, मी तिथं गेलो नसतो, हस्तक्षेप केला नसता तर तिथं वेगळं काहीतरी घडलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे असं अजित पवार म्हणाले.

त्यांनी जे उत्तर दिलं तेच मी सांगतोय, तिथं जे काही झालं त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की, मी तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडंवाकडं घडलं असतं. त्या व्यक्ती संख्येने कमी होत्या, त्यामुळे आक्रित घडलं असतं असं दत्ता भरणे यांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: महायुतीत गद्दारी! नाशिकमध्ये दराडेंच्या पराभवानंतर शिंदे संतापले, तर विजयी उमेदवाराला बोलावलं मुंबईला

Latest Marathi News Live Update : भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?

चमत्कार! माघार घेऊनही जिंकले, भाजपात 'ओपन वॉर'; नाशिकच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Nanded MLC Election Result : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची बंडखोरी; विधानपरिषदेत पराभव होताच कृष्णा पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी

Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

SCROLL FOR NEXT