Sharad Pawar-Ajit Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही : अजित पवार

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यात सुरु झालेले सत्तातराचे वादळ काही केल्या थंडावताना दिसत नाहीये.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यात सुरु झालेले सत्तातराचे वादळ काही केल्या थंडावताना दिसत नाहीये. दुसरीकडे एकनाथ शिंदेना भाजपचा पाठिंबा आहे का? या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामागे भाजपचा एखादा मोठा नेता अद्याप तरी दिसून येत नसल्याचे विधान काल केले होते. त्यावर अजित पवारांना राज्यातील स्थिती माहिती आहे. परंतु, आसाम आणि गुवाहटी येथील स्थिती माहिती नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत केले होते. दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहून माविआ टिकवायचं असून, माविआ सरकारकडे सर्व बहुमत आहे. संध्याकाळी शरद पवार प्रफुल्ल पटेलयांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे जाणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. गेल्या अडीच वर्षामध्ये ठाकरे सरकारनं उत्तम काम केल्याचही ते म्हणाले.

शरद पवार आमचं दैवत आहे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची आमची लायकी नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहणं राष्ट्रवादीचं काम आहे. राज्याबाहेर काय घडत त्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल बोलतील. माझा संबंध महाराष्ट्रापुरता आहे असं म्हणत अजित पवार यांनी गुवाहटी येथे घडणाऱ्या घडामोडींमधून स्वतःला दूर केलं आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, सरकार बहुमतात असून, सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आज सरकार बहुमतात आहे. त्यामुळे सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार निर्णय घेतले जात आहे. अनेक मंत्री मुंबईत आहेत आणि सरकारचं काम अगदी सुरळीत सुरू आहे. विधीमंडळाबाबत अध्यक्ष निर्णय घेतील असंही ते म्हणाले.

ठाकरेंचा बंडखोर शिंदेंवर हल्लाबोल,..'हीच वीट डोक्यात हाणणार'

मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही..वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. मला आरोप प्रत्यारोपांचा वीट आलाय पण हीच वीट डोक्यात हाणणार अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे.(Chief Minister Uddhav Thackeray attacked the rebel Eknath Shinde maharashtra politics)

स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. संजय राठोडांवर वाईट आरोप झाले तर त्यांना सांभाळून घेतल. बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्यात काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT