Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवार म्हणाले, आमची मते सेनेला देणार हे आधीच स्पष्ट केलेलं

संभाजी राजेंसोबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चर्चा केली होती

सकाळ डिजिटल टीम

संभाजी राजेंसोबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चर्चा केली होती

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चागंलच तापलं आहे. शिवसेनेने कोल्हापूर सेना प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देत संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट केला आहे. सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे शिवसेनेन स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी राजेंसोबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चर्चा केली होती. मात्र ही चर्चा काय आणि कशाबद्दल होती हे माहित नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

ते म्हणाले, शिवसेना आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी सुरुवातीपासूनच पक्षात येण्यासाठी संभाजीराजेंना सूतोवाच केलं होतं. मात्र आता याबाबतीत वेगळ्या बातम्या येत आहेत. कोणी, कोणता आणि काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी संभाजीराजेंना 'वर्षा'वर येण्याची विनंती केली होती. पण त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवार हे महाविकास आघाडीतील सर्वोच्च नेते आहेत. पुढे ते म्हणाले की, मागील काही दिवसांपूर्वी यासंदर्भात मी भाष्य केलं होतं. आमची मत आम्ही शिवसेनेला देणार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. आमचा ४२ मतांचा कोटा आहे. त्यांच्याकडे २७ ते २८ मत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी मंत्री अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर सुरू आहे. यंत्रणानी त्यांच्या अधिकारांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. याआधही महाविकास आघाडीतील नेत्यांवर अश्या कारवाई झाल्या आहेत. माझ्याही नातेवाईकांसंदर्भात तपास केला जात आहे. आताही कारवाई चालू आहे. मात्र कोणत्या आधारे ही कारवाई सुरू आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT