Sharad Pawar Autobiography
Sharad Pawar Autobiography Sakal
महाराष्ट्र

पहाटेचा शपथविधीनंतरही पवारांनी अजित पवारांना माफ कसं केलं? आत्मचरित्रात मोठा खुलासा

दत्ता लवांडे

मुंबई : शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. या आवृत्तीमध्ये त्यांनी राज्यातील सत्तांतराच्या सगळ्या प्रवासाबद्दल लिहिलं आहे.

त्याचबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंड करून पहाटेचा शपथविधी केल्याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकाशन सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अजित पवार यांनी केलेल्या बंडाला राष्ट्रवादीचा कसलाही पाठिंबा नव्हता, त्यांनी त्यांच्यासोबत काही आमदार घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही.

कारण त्याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नव्हता. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि नवं सरकार स्थापन झालं असा उल्लेख या आत्मचरित्रामध्ये केला आहे. (Latest Marathi News)

बंड अयशस्वी झाल्यानंतर अजित पवार जास्त बोलत नव्हते. पण या नाराजीवर पडदा पडणे आवश्यक होता. विषय कौटुंबिक असल्यामुळे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याजवळ अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली.

"जे घडलं ते चुकीचं झालं, असं घडायला नको होतं." अशा शब्दांत अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आणि या वादावर पडदा पडल्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. त्यामुळे या पुस्तकावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, पहाटेच्या शपथविधी सोहळ्याची चाहूल शरद पवार यांना त्या दिवशी पहाटे ६.३० वाजतात कळाली होती. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता पण ही गोष्ट समजताच त्यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल केला आणि या बंडाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचं सांगितलं. पण या शपथविधीमुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासही मदत झाल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना या पुस्तकाच्या प्रकाशनामागे काही कारणे आहेत का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या पुस्तकातील अलीकडच्या तीन चार वर्षातील उल्लेखाकडे सर्वांचे लक्ष असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT