Ajit Pawar NCP  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: लोकप्रतिनिधींना वागण्याचं तारतम्य नाही; अजित पवारांनी राज्य सरकारला फटकारलं

सकाळ डिजिटल टीम

शिंदे-फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांमधील लोकप्रतिनिधींना वागण्याचं तारतम्य राहिलेलं नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे.

तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परखड सवाल उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारला १०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. नव्याचे ९ दिवस असतात हे मान्य. पण लोकप्रतनिधींना कशा पद्धतीने वागायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. यांचे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना म्हणतात ‘तुमच्या बापाची पेंड आहे का? किती वाजता आला? तुमची वाट बघायला आम्ही काय तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतर तुम्हाला समजेल’. महाराष्ट्रात ही भाषा? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?” अशा शब्दांत अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला आहे.

तसेच, एवढ्यावरच हे थांबलेलं नाही. काही मंत्र्यांच्याही अर्वाच्य भाषेत संवाद साधणाऱ्या ऑडिओ क्लिप व्हायल झाल्या आहेत. त्यात नेमका आवाड मंत्र्यांचाच आहे की कुणी नकली आवाज काढला हे समजलं पाहिजे. मंत्र्याला बदनाम करण्यासाठी कुणी कारस्थान केलंय का हेही तपासा. अशी पवारांनी मागणी केली आहे.

पण जर मंत्रीच ‘काम नाही का रे तुम्हाला सणासुदीचं? दिवसभरात ५०० फोन लावता? मी ती परीक्षा रद्द केली. फोन ठेव’, अशी भाषा वापरत असतील तर? ही भाषा? एक तर बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. भरतीच्या नुसत्या घोषणा सुरू आहेत. तरुण-तरुणी आशेनं त्या विभागाच्या मंत्र्यांना फोन करतात. पण त्यांची फोनवर ही भाषा आहे. यासाठी त्यांना मंत्री केलंय का? याचंही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे”

यासोबतच, सरकारने, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. यांच्या आमदारांनी तारतम्य ठेवलं पाहिजे. यांच्या लोकप्रतिनिधींना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिलेला नाही. याची नोंद सरकारने घेतली पाहिजे. अशा शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फटकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WORLD CUP : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वर्ल्ड कपच्या संघात करावे लागले दोन बदल; पॅट कमिन्सची माघार, तर...

Palghar News: रील्स करत ठाकरे बंधूंना शिवीगाळ, कार्यकर्ते आक्रमक, तरुणाला भररस्त्यात अर्धनग्न करून...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या बीडच्या दोघांना तामिळनाडूमध्ये अटक

झी मराठीचा ओरिजिनल खलनायक इज बॅक! तारिणी' मध्ये होणार नवी एंट्री; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलंच

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाच्या आणखी जवळ; गटनेता निवड अन् शपथेपूर्वीच खासदारकी सोडली

SCROLL FOR NEXT