sharad pawar and ajit pawar 
महाराष्ट्र बातम्या

NCP : राष्ट्रवादीत मतभेद! 'या' मुद्द्यावर अजित पवारांची शरद पवारांपेक्षा वेगळी भूमिका

Sandip Kapde

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराचे समर्थन केले आहे. ईव्हीएमवर माझा पूर्ण विश्वास असल्याचे पवार म्हणाले. एक व्यक्ती ईव्हीएममध्ये फेरफार करू शकत नाही, ही एक मोठी यंत्रणा आहे. हरलेला पक्ष ईव्हीएमला दोष देतो, पण तो जनतेचा जनादेश आहे, असे अजित पवार म्हणाले.

एकीकडे विरोधी नेते ईव्हीएम विरोधात आवाज उठवत आहे. शरद पवार यांनी देखील ईव्हीएम विरोधात भूमिका मांडली होती. शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, कपिल सिब्बल यांनी दिल्लीत एकत्र पत्रकार परिषद घेत ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगात जाण्याता इशारा दिला होता. मात्र आता अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे एकाच पक्षाच्या दोन भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

शिवसेनेच्या (ठाकरे) सामनामध्ये ईव्हीएमला लक्ष्य करण्यात आले आहे. सामनामध्ये केंद्र सरकारला बांगलादेशप्रमाणे ईव्हीएम ऐवजी मतपेटीद्वारे निवडणुका घेण्याचे आव्हान दिले, यावर अजित पवार म्हणाले, माझा वैयक्तिकरित्या ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. ईव्हीएममध्ये बिघाड असती तर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार नसते.  

अजित पवार म्हणाले, ईव्हीएममध्ये फेरफार करणे एका व्यक्तीला शक्य नाही कारण ही एक मोठी यंत्रणा आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे सिद्ध झाले, तर देशात मोठा गदारोळ होईल. त्यामुळेच असे करण्याचे धाडस कोणी करेल असे मला वाटत नाही. विश्वास असणूही कधी-कधी काही लोक निवडणूक हारतात, त्यामुळे ते ईव्हीएमला दोष देऊ लागतात आणि त्यातून सुटका करून घेतात, पण हाच खरा जनतेचा जनादेश आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET बंधनकारक! प्रमोशन नाहीच, नोकरीही सोडा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, फक्त 'या' शिक्षकांना दिलासा

Car Launch 2025 : सप्टेंबर महिना कार प्रेमींसाठी एकदम खास! 'या' 5 गाड्यांची होणार धडाकेबाज एन्ट्री

Maratha Reservation : मराठा आंदोलन अजूनही हाताबाहेर गेले नाही, सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी : सुप्रिया सुळे

Maratha Reservation : 'आझाद मैदानात बसतील तेच आंदोलक, इतरत्र फिरणाऱ्यांवर होणार कारवाई'; कोर्टाचा दाखला देत विखे-पाटील स्पष्टच बोलले...

Australia Immigrants Protest : ऑस्ट्रेलियात भारतीय स्थलांतरितांविरोधात वाढता रोष; देशव्यापी आंदोलनांची लाट

SCROLL FOR NEXT