Ajit Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: आघाडीत बिघाडी? अजित पवार म्हणाले, आता विषय संपला...

शरद पवारांच्या ऐतिहासिक घोषणेवेळी अजितदादा गैरहजर होते पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार यांनी जाहीर केलेला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागे घेतल्याचं जाहीर केलं. पण यावेळी अजित पवार त्यांच्यासोबत दिसले नाही. शरद पवारांनीही पत्रकारांना उत्तर दिलं. पण अजूनही अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर आज अजित पवार बोलताना म्हणाले की शरद पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे.

काय म्हणालेत अजित पवार?

काल शरद पवार साहेब तुमच्याशी बोलले. त्यांनी जे सांगायचं आहे ते सांगितलं. जे साहेबांचं मत आहे टेक आमचं मत आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे तो सर्वाना सांगितलं आहे. त्यांच्या निर्णयाने सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे. शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे.

तुम्हाला बाकी सर्व गोष्टी माहिती आहेत. साहेबांनी कार्यकर्त्यांच्या, पक्षातीन नेत्यांच्या आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. आता आम्ही पुन्हा कामाला लागलो आहे. राजीनाम्याचा विषय आता संपला आहे. तर महाविकास आघाडीला कुठलाही धक्का लागणार नाही, आम्ही एकत्र होतो एकत्र आहोत असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांना अजितदादा गैरहजर का? असा सवालही करण्यात आला. त्याबाबत बोलताना शरद पवार यांनी अजितदादांची बाजू सावरून घेत म्हणाले होते की, ‘पत्रकार परिषदेत सगळे असतात काय? हे आमचे बाकीचे सहकारी आहेत.. त्यांचंही मला आश्चर्य वाटतं. कारण सहसहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षातील नेतृत्वाची फळी कधी बसत नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT