Ajit pawar
Ajit pawar sakal
महाराष्ट्र

Ajit Pawar : 'दोनच अपत्यावर थांबा, पलटण वाढवू नका'; अजित पवारांचा महिलांना सल्ला

सकाळ डिजिटल टीम

बारामती : "दोनच अपत्यांवर थांबा, जास्त पलटण वाढवू नका, वंशाच्या दिव्याच्या पाठीमागे लागू नका" असा निर्वाणीचा सल्ला विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी बारामती येथे भाषणात बोलताना महिलांना दिला आहे. बारामती येथे गरजू महिलांना स्वेटर वाटपाच्या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हा सल्ला दिला.

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

"आपली मुलगी किंवा सुनबाईलापण दोनच अपत्यावर थांबण्याचा सल्ला द्या. मर्यादित कुटुंब ठेवा, उगाच वंशाचा दिवा म्हणून कुटुंब वाढवू नका, देवाची कृपा म्हणून उगाच पलटण वाढवता, आम्हाला माहिती नाही का देवाची कृपा आहे की कुणाची आहे ते" असा सल्ला त्यांनी महिलांना दिला आहे.

दरम्यान, महिलांना अजित पवारांनी शरद पवार यांचं उदाहरणं दिलं आहे. शरद पवार साहेब हे सुद्धा एकाच अपत्यावर थांबले. त्यांनी जास्त मुले होऊ दिली नाही, मुलीसुद्धा कर्तृत्ववान असतात असंही ते म्हणाले आहेत. सुप्रियासुद्धा पवार साहेबांचेच नाव काढते म्हणून दोन पेक्षा जास्त अपत्य होऊ देऊ नका असं पवार म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

SCROLL FOR NEXT