Ajit Pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar on Winter Session: "विदर्भातल्या प्रश्नांना प्राधान्य देणार"; अधिवेशनाच्या स्ट्रॅटजीवर अजितदादांनी मांडली भूमिका

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेली विरोधकांची बैठक संपली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नागपूर इथं होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधीपक्षांच्या गटनेत्यांची बुधवारी बैठक पार पडली. यावेळी अधिवेनशनात विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य मिळालं पाहिजे, यावर एकमत झाल्यांचं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या बैठकली सर्वच गटनेते हजर होते फक्त जयंत पाटील आणि नाना पटोले येऊ शकले नाहीत. (Ajit Pawar told strategy during ahead Assembly Winter Session of Maharashtra)

अजित पवार म्हणाले, बैठकीत साधारण अधिवेशनाच्या निमित्तानं कोणते विषय चर्चेला घ्यायचे सर्वांमध्ये एकजूट कशी राहिली पाहिजे यावर चर्चा झाली. आजच कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार होती पण ती अचानक पुढे ५ तारखेला ढकलली गेली. त्यामुळं अधिवेशन १९ डिसेंबरला सुरु झाल्यानंतर किती काळा करता घ्यायचं याबाबत सरकारच्या मनात काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, अधिवेशनात आम्ही आमची भूमिका मांडूच मांडू, पण एक कार्यक्रम असा छापला गेला आहे की, ज्यात पाच दिवसांचं कामकाज दाखवण्यात आलं आहे. तर पुढच्या आठवड्यात शासकीय-अशासकीय कामकाज दाखवलं गेलं आहे.

पण कामकाज सल्लागार समितीचं याबाबत निर्णय घेईल. यामध्ये विरोधीपक्षाच्यावतीनं विषयांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना सांगू असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

यंदाचं हिवाळी अधिवेशन विदर्भात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही विदर्भात अधिवेशन झालं पण कोविडमुळं ते फार काळ होऊ शकलं नाही. त्यानंतरही पुन्हा तिच परिस्थिती होती. याकाळात विदर्भातील प्रश्नांवर जास्त काम होऊ शकलं नव्हतं त्यामुळं यंदा आमची हीच भूमिका राहणार आहे की विदर्भातील प्रश्नांना जास्तीत जास्त प्राधान्य मिळालं पाहिजे. त्याशिवाय इतर प्रश्नांवर अंतिम आठवडा प्रस्ताव असतो त्यामध्ये इतर प्रश्न घ्यायचं ठरवेलं आहे. यापद्धतीनं बैठकीत सर्व चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT