Sharad Pawar VS Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादी कोणाची? आज सर्वोच्च न्यायालय अन् निवडणूक आयोगासमोर सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह नक्की कोणत्या पवारांच ? शरद पवारांच की अजित पवारांच या विषयी आज महत्वाच्या सुणावण्या होणार आहेत. शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात अजित पवार गटाविरोधातं दाखल केलेल्या याचिकेवर आज पहीली सुणावणी होणार आहे. तर पक्ष आणी चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी होणार आहे.

शुक्रवारी निवडणूक आयोगात झालेल्या पहिल्या सुनावणी वेळी शरद पवार यांनी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवला असा आरोप अजित पवार गटाने केला होता. तर पक्षाचं चिन्ह गोठण्यात येऊ नये अशी शरद पवार गटाने मागणी केली होती.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाची या प्रश्नाच उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला हवं आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि सोबतचे मंत्री अपात्र होणार का ? असा सवाल सगळ्यांनाच पडला आहे. या विषयीच्या महत्वाच्या सुनावण्या आज होणार आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाचा प्रश्न नुकताच उपस्थित केला होता. यावेळी निवडणूक आयोगाचा पेपर आधीच फुटला आहे पेपर देण्याआधीच यांना निकाल कसा कळला? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यामुळे आजच्या दोन्हीही सुनावण्या खूप महत्वाच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT