Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar As CM: तारीख सुद्धा ठरली! 'या' दिवशी घेणार अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ? दिल्लीश्वरांचा पाठिंबा

Maharashtra Politics News Live Updates : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे

राहुल शेळके

Political Twist In Maharashtra : रविवारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार, संसदेचे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टला संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे वृत्त इंग्रजी न्यूजपोर्टलने दिले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व 16 आमदारांना अपात्र ठरवतील, त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले जाईल ज्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे रेडिफने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

रेडिफला मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर, भाजपने त्यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री म्हणून नेमण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले आहे.

20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. परंतु भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

अजित पवार मार्च (2022) पासून अमित शहा यांच्या नियमित संपर्कात होते; शिंदे यांच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने म्हटले आहे.

आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगात अर्ज करण्यात आला असून कोणत्याही गटाने पक्षावर दावा केला तर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असा अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांच मोठं पाऊल मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT