Ajit Pawar, Abdul Sattar, Vijay Shivtare and Supriya Sule 
महाराष्ट्र बातम्या

अजितदादा शिवतारेंप्रमाणेच करणार सत्तारांचा 'करेक्ट' कार्यक्रम? सुळेंवरील टीकेने चर्चेला उधाण

रवींद्र देशमुख

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणातील टीका टिप्पणीची पातळी खालावली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील अनेक नेते सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यात आघाडीवर आहेत. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आली. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी अद्याप या मुद्दावर मौन बाळगलं आहे. त्यामुळे अजित दादा विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्याप्रमाणेच सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे. (Ajit Pawar news in Marathi)

२०१८ साली पुरंदरचे आमदार आणि तत्कालीन मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्यावर अशाच प्रकारे टीका केली होती. त्यावेळी अजित पवार चांगलेच संतापले होते. अजित पवार म्हणाले होते की, विजय शिवतारे पोपटासारखे लैच बोलतात. अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती, तुझा अवाका किती? तु बोलतो कोणाबरोबर? तुला दाखवतोच तु २०१९ला कसा आमदार होतो, असं उघड आव्हान अजित पवार यांनी दिलं होतं. तसेच अख्ख्या महाराष्ट्राला ठावूक आहे की, मी कोणाला पाडायचं ठरवलं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही, असंही अजित पवार म्हणाले होते.

२०१९ मध्ये विजय शिवतारे यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवार यांनी दिलेल्या चॅलेंजची जोरदार चर्चा झाली होती. आता शिंदे गटातील नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे अजित पवार आता सत्तार यांचा शिवतारे यांच्याप्रमाणेच करेक्ट कार्यक्रम करणार का, असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित कऱण्यात येत आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी काही दिवसांपासून मौन बाळगले आहे. त्यामुळे अजित पवार शांत राहून सत्तार यांना दणका देणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Sleeper Bus Gang-Rape : दिल्ली हादरली ! धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपी अटकेत

Satara District Bank: सातारा जिल्हा बँकेचा आखाडा तापला! २५० ठरावांमुळे उदयनराजेंचे पारडे जड, राजेंची ताकद अन् दिग्गजांची अडचण

Mumbai High Court: पूर्वलक्षी प्रभावाने लादलेली भाडेवाढ रद्द, मुंबई बंदर प्राधिकरणाला दणका

Marathi News Live Updates : प्रदेश भाजप कार्यकारिणीनंतर उद्या भाजपची महत्त्वाची बैठक

Sugar Before Age 2: वयाच्या २ वर्षांपूर्वी मुलांना किती साखर देता? याचा परिणाम मोठेपणीही होतो; संशोधनात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT