महाराष्ट्र बातम्या

आम्ही जावईहट्ट पुरवत आलोय, अजितदादांची विधानसभा अध्यक्षांपुढे फटकेबाजी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. महाराष्ट्र विधानसभेत राहुल नार्वेकर हे सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. त्यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा केली. तर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना त्यांच्याकडे विरोधकांचा हट्ट पुरविण्याची मागणी केली. (Ajit Pawar's demand to Assembly Speaker Rahul Narvekar)

अजित पवार यांनी आपल्या भाषणात नार्वेकर हे राष्ट्रवादी पक्षात होते अशी आठवण करून देताना मावळ लोकसभा मतदार संघातून 2014 साली आमचे उमेदवारही होते असं म्हटलं. नार्वेकर हे अत्यंत हुषार असून कायद्याचे अभ्यासक आहेत. मात्र त्यांचं चातुर्य मी पाहात आलो आहे.

ज्या पक्षात जातील तिथं पक्ष नेतृत्वाला आपलं करून घेतात. राष्ट्रवादीत असताना त्यांनी मला आपलं केलं. शिवसेनेत गेल्यावर ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय झाले. तर आता भाजपमध्ये जावून देवेंद्र फडणवीसांना त्यांनी आपलंस केलं. आता एकनाथ शिंदेची वेळ असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.

अजित पवार पुढं म्हणाले की, राहुल नार्वेकर विधान परिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. अर्थात आमचे जावई आहेत. आम्ही अनेकदा जावईहट्ट पुरवत आलो आहोत. यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा अशी मागणी अजित पवार यांनी आपल्या अभिनंदन भाषणात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT