Akhil Bhartiya Natya Parishad Mahabaleshwar
Akhil Bhartiya Natya Parishad Mahabaleshwar esakal
महाराष्ट्र

Natya Parishad : नाट्यसंस्कृतीला बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करणार; CM शिंदेंची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

महाबळेश्वर येथे दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह असून, ते सध्या बंदस्थितीत आहे. हे नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची सूचना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

महाबळेश्‍‍वर : महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा गौरवशाली वारसा लाभला आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधानियुक्‍त असावीत, यासाठी अकरा तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी बोलताना दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे (Akhil Bhartiya Natya Parishad) शंभरावे विभागीय नाट्यसंमेलन पोलिस परेड मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यनगरीत होत आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, माजी संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्ठ अभिनेते मोहन जोशी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर, अजित भुरे, सतीश लोटके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह विविध मान्यवर, कलाकार, नाट्य परिषदेचे पदाधिकारी, रसिक व महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष डी. एम. बावळेकर, उपाध्यक्ष संतोष शिंदे, बबनराव ढेबे, मुख्याधिकारी योगेश पाटील, विलास काळे, संजय दस्तुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाबळेश्वर महोत्सव २०२४ चेही उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी महाबळेश्वर येथे सध्या बंदस्थितीत असलेले नाट्यगृह सोयीसुविधा उपलब्ध करून पुन्हा सुरू करण्यात यावे, असे सांगितले, तसेच उत्तम नाट्यगृहांची संकल्पना साकारण्यासाठी आचारसंहितेपूर्वी, समिती नेमण्यात यावी, असे आवाहन केले. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले, ‘‘कला आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट आहे. विविध कलांसाठी सर्वांगीण आणि एकात्मिक, परिपूर्ण असे व्यासपीठ असले पाहिजे. त्यासाठी विचारवंत, कलावंत आणि रसिक यांची समिती स्थापन करून कलेच्या उत्थानासाठी कार्य व्हावे,’’ असे नमूद केले.

प्रारंभी येथील वेण्णादर्शन परिसरातून दिंडीस प्रारंभ झाला. या दिंडीमध्ये मराठी सिने नाट्यसृष्टीतील प्रशांत दामले, नीलम शिर्के-सामंत, हार्दिक जोशी, मेघा धाडे, अक्षया देवधर, संजय खापरे, सविता मालपेकर असे दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. या दिंडीत शहरातील महिलांची वारी व वारकऱ्यांनी रंगत वाढविली. या रॅलीमध्ये दिव्यांग बांधवांचा सहभाग आकर्षित करत होते.

मुख्‍यमंत्री म्‍हणाले...

  • अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमीला बहर

  • नाट्य रसिकांसाठी रंगभूमीकडून काळानुरूप अनेक बदलांचा स्वीकार

  • सध्‍‍या मराठी रंगभूमीचा अनेक अडचणींवर मात करत प्रवास

  • नाट्यसंमेलनांमधून नवकलाकार उदयास आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य

  • विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या नाट्यसंमेलनातून गौरवशाली संस्कृतीचा विस्तार

डीपीसीतून निधी

महाबळेश्वर येथे दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह असून, ते सध्या बंदस्थितीत आहे. हे नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची सूचना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई येथील फिल्म सिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात येणार आहे. मराठी भाषा व नाट्य चळवळ यांना बळ देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT