Akola Accident cm eknath shinde announced an aid of four lakhs to families of victims  
महाराष्ट्र बातम्या

Akola Accident: मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत; CM शिदेंनी दिले महत्वाचे आदेश

अकोल्यामधील पारसगावातील मंदिराच्या शेडवर झाड कोसळून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

धनश्री ओतारी

अकोल्यामधील पारसगावातील मंदिराच्या शेडवर झाड कोसळून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 37 जण जखमी झाले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच महत्त्वाचे आदेशदेखील दिले आहेत. (Akola Accident cm eknath shinde announced an aid of four lakhs to families of victims )

पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'पारसची घटना अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहे. त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळले आणि ते शेड कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये 37 जण जखमी झाले आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावे अशा सूचना दिल्या आहेत.'

'या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारच्या वतीने केला जाईल. तर मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येईल. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या सर्व संवेदना या परिवाराच्या सोबत आहे.' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT