politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Politics: "राज्यातील पालकमंत्र्याची पदे बोगस" सर्व पदे बरखास्त करावीत; किसान आर्मीची मागणी

‘पालकमंत्र्यांची पदे बरखास्त करा’

रुपेश नामदास

पुणे: राज्यातील सर्व पालकमंत्र्याची पदे बोगस असून, या पदाला कोणताही स्पष्ट कायदेशीर व प्रशासकीय आधार नसल्याचा आरोप किसान आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी केला आहे.

पालकमंत्र्याची निवड, नियुक्ती, रचना, जबाबदारी, कार्यकक्षा, कार्यपद्धती या संदर्भात स्वतंत्र समिती नेमून एक स्वतंत्र कायदा किंवा शासन निर्णय पारित होत नाही, तोपर्यंत सर्व पालकमंत्र्यांची पदे बरखास्त करावीत अथवा त्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

या पदासंदर्भातील उपलब्ध शासन निर्णय ७ जुलै १९५९ रोजीचा असून, तो राज्यनिर्मिती पूर्वीचा आहे. तर त्यानंतरचा २० जानेवारी २००० रोजीचा आहे. हे दोन्हीही शासन निर्णय केवळ कल्याणकारी राज्याची पाहणी करणे यापुरताच मर्यादित आहे.

महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम १९९८ नुसार पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतील असे जरी म्हटले असले, तरी पालकमंत्री म्हणून मूळ नियुक्तीला कोणताही कायदेशीर व प्रशासकीय आधार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT