Chandrakant patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation:चंद्रकांत पाटलांच्या अनुपस्थितीमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी.. या नेत्याला अध्यक्ष करायची मागणी

Chandrakant Patil:चंद्रकांत पाटील सकारात्मक नाहीत, त्यामुळे त्यांना बदलावं, अशी मागणी अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी बैठकीत केली

Manoj Bhalerao

नुकतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. यात मराठा आरक्षणाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठा आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे यांनी सरकारकडे ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले असून तीन अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आलं आहे. या परिषदेनंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील अनुपस्थित होते. चंद्रकांत पाटलांच्या अनुपस्थितीमुळे सत्ताधारी पक्षात नाराजीचे सुर दिसत आहेत. सर्वपक्षीय बैठकीत मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष नसल्याने चर्चांना उधाण आले.

चंद्रकांत पाटील सर्वपक्षीय बैठकीला हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत पाटील सकारात्मक नाहीत, त्यामुळे त्यांना बदलावं, अशी मागणी अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी बैठकीत केली. सर्वपक्षीय बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकात पाटलांऐवजी अजित पवार यांना अध्यक्ष करावं, अशी मागणी करण्यात आली.चंद्रकांत पाटील समितीचे अध्यक्ष असतानाही ते बैठकीला का उपस्थित नाहीत, असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला.

सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहात बंद दाराआड पुन्हा चर्चा झाली. मनोज जरांगे यांच्या भेटीला सरकारच्या वतीने कोण भेटायला जाणार, याबाबत चर्चा केली जाऊ शकते. तसेच साताऱ्यामध्ये घडलेल्या घटनेचा देखील आढावा घेतला जाऊ शकतो.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT