ratnagiri
ratnagiri esakal
महाराष्ट्र

शासनाच्या अटीमुळे पर्ससीन मासेमारी धोक्यात, मच्छिमांरांचा विराट मोर्चा

- राजेश शेळके

मिरकरवाडा जेटीपासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.

रत्नागिरी : नवीन मासेमारी कायद्यातील (Fish Act) जाचक अटीमुळे अडचणीत आलेल्या पर्ससीन मासेमारी धोक्यात आली आहे. शासनाने या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी आज विराट मोर्चा काढण्यात आला. मिरकरवाडा जेटीपासून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हजारोच्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला. (New Law Of Fisherman)

समुद्रातील मत्स्य साठ्यावर होणार्‍या प्रतिकूल परिणामाला प्रत्येकवेळी पर्ससीन नेट मासेमारीलाच जबाबदार धरून या मासेमारीवर जाचक निर्बंध टाकण्यात आले. इतर मासेमारी जाळ्यांनी होणार्‍या मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मत्स्यसाठा जतन करण्याबाबत नव्याने होणार्‍या अभ्यासात ट्रॉलनेट, डोलनेट, गिलनेट, हूक अ‍ॅन्ड लॅन्ड या मासेमारीचाही अभ्यास झाला पाहिजे, या मागणीसाठी पर्ससीन नेट मच्छिमार, मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असणारे पुरक व्यावसायिक मोठा मोर्चा काढला.

मच्छिमारांचे सागरी मासेमारीच्या सुधारित कायद्याविरोधात गेल्या 3 जानेवारीपासून साखळी उपोषणही सुरू आहे. समुद्रातील मत्स्यसाठ्याचे जतन करण्याच्या नावाखाली मागील अभ्यासगटाच्या निर्देशानुसार पर्ससीन नेट मासेमारी कालावधी, समुद्र क्षेत्र आणि परवाना नुतनीकरण व नवीन परवाना देण्याबाबत निर्बंध टाकण्यात आले आहेत. त्याचवेळी जो सुधारित कायदा झाला आहे त्यात पर्ससीन नेट मासेमारीला उद्ध्वस्त करणार्‍या तरतुदी आहेत. याविरुद्ध गेले तीन महिने साखळी उपोषण सुरुच आहे.

पर्ससीन नेट मासेमारीवर वेळोवेळी बंधने टाकण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. आता ज्या अभ्यास समितीच्या निकषानुसार पर्ससीन नेट मासेमारीवर निर्बंध लादले जातात त्या समितीचेच लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून मच्छिमार, नौका मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असलेले उद्योजक, व्यावसायिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. नव्याने गठीत झालेल्या समितीने केवळ पर्ससीन नेट मासेमारीला लक्ष्य करू नये. इतरही जाळ्यांद्वारे होणार्‍या मासेमारीचा विचार केला जावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT