Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: खातेवाटप जाहीर झालं देखील नाही पण अजितदादा लागले कामाला, अर्थ विभागाची घेतली बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, आजपासून मंत्रालयातून कामकाजाला केली सुरुवात

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी इतर आठ आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी आज मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे. अजित पवार आज सकाळी ९.४५ वाजता मंत्रालयात दाखल झाले. यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली. सध्या अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची बैठक सुरू आहे.(Latest Marathi News)

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रशासकीय कामाला सुरवात केली आहे. अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक बैठक बोलावली आहे. अर्थ विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासोबत ते बैठक घेत आहेत. (Marathi Tajya Batmya)

अद्याप आधिकृत खातेवाटप झाले नाही, मात्र अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. खातेवाटप जाहीर झालेलं नसताना अजित पवार यांनी आजपासून कामाला सुरवात केली आहे. डॉ. नितीन करीर हे प्रधान सचिव आहेत त्यांच्यासोबत अजित पवारांची बैठक सुरू आहे. तर अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या मांडायच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची महत्वाची बैठक सुरू असल्याची माहीती आहे.(Latest Marathi News)

तर अजित पवार यांनी ही अर्थ विभागाच्या बैठक बोलावली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे कि, अजित पवार यांना अर्थखातं मिळणार आहे. याच अनुषंगाने अजित पवार यांनी ही बैठक बोलावली असल्याची चर्चा सुरू आहे. डॉ. नितीन करीर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर लवकरच खातेवाटप होईल आणि अर्थखातं अजित पवारांना मिळण्यावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Yavatmal: पत्नीसह २ मुलांना विहिरीत ढकललं, नंतर ३५ वर्षीय पतीनं स्वत:लाही संपवलं, यवतमाळ हादरलं

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

SCROLL FOR NEXT