Ajit Pawar sad  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: दिल्लीदरबारी यांचे महत्त्व किती ते कळले.. अमित शाह यांच्या भेटीवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका !

कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलमुळे उस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर आधारित कारखानीदारीदेखील अडचणीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ambadas Danve: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेणार होते. मात्र, ही भेट स्थगित झाली. या पार्श्वभूमीवर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी,‘दिल्लीतील राज्य सरकारचे महत्त्व यावरून लक्षात आले आहे’, असे टोला शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

शेतकऱ्या आत्महत्यांसंदर्भात एक अहवाल पुढे आला आहे. त्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत २ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि मदत देईल, असेही वाअत नाही. सरकार शेतकऱ्यांविषयी खोटारडी भूमिका घेत आहे. कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री दिल्ली अमित शहा यांना भेटणार होते. परंतु, तेही यांना वेळ देत नाही.

त्यामुळे दिल्लीदरबारी यांचे महत्त्व किती आहे, हे कळते; अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलमुळे उस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर आधारित कारखानीदारीदेखील अडचणीत आहे. आठ दिवसांपासून यावर तोडगा निघालेला नाही, हे दुर्दैव आहे.

मुदतीतच निर्णय व्हावा

आमदार अपात्रताप्रकरणी निर्णय घेण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. या मुदतीतच विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु, पुन्हा अध्यक्षांनी मुदतवाढीची विनंती न्यायालयात करणे चुकीचे आहे, असे दानवे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT