America Warned India
America Warned India  E sakal
महाराष्ट्र

...तर गंभीर परिणाम भोगावे लागणार, अमेरिकेचा भारतासह चीनला इशारा

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर आक्रमण (Ukraine Russia War) केल्यानंतर अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. मात्र, या निर्बंधांमध्ये अडथळा निर्माण करू पाहणाऱ्या देशांना वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने भारतासह तटस्थ भूमिका स्वीकारलेल्या अन्य देशांना दिला. तसेच भारत तेलासह अन्य वस्तूंची रशियातून करत असलेल्या आयातीवर देखील नाराजी व्यक्त केली. तसेच भारत चीन सीमावादावरून देखील अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (डेप्युटी NSA) दलीप सिंग यांनी भारताला सावधानतेचा इशारा (America Warned India) दिला.

रशियाविरुद्ध अमेरिकेच्या निर्बंधांचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे यूएस डेप्युटी एनएसए बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत आले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर टीका न करण्याच्या भारताच्या भूमिकेवर पाश्चिमात्य देशांमध्ये वाढत्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा होत आहे. त्यानंतर सिंग यांची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेला रशियाच्या मध्यवर्ती बँकेसोबत आर्थिक व्यवहारात गुंतलेला कोणताही देश बघायला आवडणार नाही. भारताची रशियन ऊर्जेची आयात अमेरिकेच्या कोणत्या निर्बंधांचे उल्लंघन करत नाही. कारण, अमेरिकेने रशियाला ऊर्जा पुरवठ्यात सूट दिली आहे.

रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव हे नवी दिल्लीकडून रशियन तेल खरेदीसह द्विपक्षीय व्यापारावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असताना अमेरिकेच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची हे वक्तव्य आलं आहे. आम्ही डॉलर-आधारित आर्थिक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणारे देश आणि आमच्या आर्थिक निर्बंधांना रोखणाऱ्यांना पाहण्याची इच्छा नाही. भारतानं रशियाकडून आयात वाढवल्यास आम्ही ते सहन करणार नाही. तसेच भारताच्या ऊर्जा आणि संरक्षण उपकरणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिका मदत करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले, असंही ते म्हणाले. चीन हा रशियाचा सर्वात महत्वाचा भागीदार आहे. पण, त्याचा परिणाम भारतावर होणार आहे.

रशिया चीनसोबत या संदर्भात कनिष्ठ भागीदार असणार आहे. चीन रशियावर जितका प्रभाव टाकेल, तितका भारताला धोका पोहोचेल. चीनने LAC चे उल्लंघन केले तर रशिया भारताच्या रक्षणासाठी धावून येईल असं वाटत नाही. रशियाची आक्रमकता थांबवली नाही तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा इशाराही सिंग यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Sunil Chhetri Net Worth: ऑडी, फॉर्च्युनर सारख्या कारचा मालक, बेंगळुरूमध्ये आलिशान घर; फुटबॉलपटू सुनील छेत्रीची संपत्ती किती?

Latest Marathi News Live Update: दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आप सहआरोपी - अंमलबजावणी संचालनालय

SCROLL FOR NEXT