Amit Shah and Prakash ambedkar  
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah : अमित शहांनी भाषणात प्रकाश आंबेडकरांचा केला उल्लेख; चर्चांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज दुसऱ्या दिवशी ते कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी २०२४च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

अमित शहा म्हणाले की, मी इथे २०२४ च्या विजयी अभियानासाठी आलो आहे. २०२४ मध्ये पुन्हा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपसह घटकपक्ष निवडणूक लढवणार आहे. तर पुढे महाविकास आघाडीतील तीन पक्षांसह प्रकाश आंबेडकर आपल्याविरुद्ध लढणार आहे. मात्र पुढची निवडणूक भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठी नाही, पुढची निवडणूक मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी नाही. २०२४ ची निवडणूक महान भारताच्या रचनेसाठी आणि समृद्ध भारत बनविण्याची असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं.

मोदीजींनी ९ वर्षांच्या आत मोठं परिवर्तन केलं. देशाची प्रगती झाली. देशाची सुरक्षा झाली. देशात समृद्धी आणली. त्यामुळे सर्व एकत्र आले आहे. येथे आलेले कार्यकर्ते पाहून आपण कधी पराभूत होऊ हे शक्य नाही. त्यातच मोदींजी यांच्यासारख नेतृत्व असेल तर पराभव दूरपर्यंत दिसत नाही, असंही शहा यांनी नमूद केलं.

दरम्यान अमित शहा यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष सध्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा करत आहे. अद्याप प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील झालेली नाहीत. मात्र अमित शहा यांनी त्यांचा भाषणात उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

शहा म्हणाले २००४ ते २०१४ पर्यंतच्या काळात कोणाही पंतप्रधानांना पंतप्रधान मानत नव्हतं. सगळे स्वत:लाच पंतप्रधान समजायचे. दररोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येत होत्या. सरकार चालवणाऱ्यांना कळत नव्हतं की, कोण आज आपल्या डोक्यात टपली मारेल. दररोज पाकिस्तान भारतात घुसखोरी करत होते. पाकिस्तानविरुद्ध भूमिका घेण्याची कोणाची हिंमत नव्हती, असंही शहा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : येवल्यात तासाभरापासून मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT