महाराष्ट्र बातम्या

Amit Thackeray : ''आमच्या बिनशर्त पाठिंब्यावर त्यांनी मुलाला आमदार केलं..'' वरळीतून अमित ठाकरे लढणार? म्हणाले...

''याच्यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता'' असं उत्तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दिलं आहे. वरळीतल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. अमित ठाकरे वरळीतून लढणार, अशी चर्चा आहे. मनसेने विधानसभेची तयार सुरु केल्याचंही दिसून येतंय.

संतोष कानडे

Amit Thackeray on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली होती. केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून काहींनी 'बिनशर्ट' पाठिंबा दिला. त्यांनी शर्ट काढून, उघडं होऊन पाठिंबा दिल्याची बोचरी टीका राज ठाकरे यांच्यावर केली होती.

''याच्यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता'' असं उत्तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दिलं आहे. वरळीतल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. अमित ठाकरे वरळीतून लढणार, अशी चर्चा आहे. मनसेने विधानसभेची तयार सुरु केल्याचंही दिसून येतंय.

अमित ठाकरे म्हणाले की, आम्ही विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पहिली बैठक वरळी आणि आता सगळीकडे बैठक घेणार आहोत. आदित्य ठाकरेंवर बोलताना ते म्हणाले, शेवटचे तीन महिने काम करुन काही होत नाही, एका आमदाराला पाच वर्षे मिळतात.. मात्र पाच वर्षात आणि कोविड काळात या ठिकाणी काही काम झालेलं नाही. यांच्यासाठी आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता, असं अमित म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या 'बिनशर्ट'च्या टीकेवर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, त्यांना ते समजावून सांगायला दहा मिनिटं लागली. त्यांना आम्ही वरळीत बिनशर्त पाठिंबा दिला हे दिसलं नव्हतं का? त्यांनी बिनशर्त पाठिंबा घेतला आणि मुलाला आमदार केले.. राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष काढला आणि वाढवलाय, अशीही बोचरी टीका अमित ठाकरेंनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT