Amol Kolhe on Nawab Malik ED Enquiry e sakal
महाराष्ट्र बातम्या

'पुरुन उरेल रांगडा...'; मलिकांवरील कारवाईनंतर कोल्हेंचे भाजपवर काव्यास्त्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ईडीने मंत्री नवाब मलिकांना (Nawab Malik) आज सकाळीच त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांची ईडी कार्यालयात तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंत्री नवाब मलिकांना ईडीने अटक (ED Arrested Nawab Malik) केली. त्यावरूनच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी कविता करत भाजपवर टीका केली आहे. (Amol Kolhe on Nawab Malik ED Enquiry)

''भाजप सत्तेसाठी ईडीचा वापर करत असून विनाकारण नेत्यांवर ईडीची छापेमारी केली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार भाजपच्या नजरेत खुपतेय. त्यामुळे ईडीची कारवाई होतेय. तपास यंत्रणा ईडीच्या सालगडी बनल्या असून भाजपमध्ये काहीच घोटाळे नाहीत का?'' असा सवाल खासदार अमोल कोल्हेंनी उपस्थित केला आहे.

अमोल कोल्हेंची कविता नेमकी काय? -

सत्तेच्या माडीसाठी

ईडीची शिडी

विनाकारण मारी

धाडीवर धाडी

सलते सत्तेवरील

महा-आघाडी

म्हणून कमळाबाई

ती लाविते काडी

तपासयंत्रणा झाल्या

कमळीच्या सालगडी

पाकळ्यांमध्ये नाहीत का

काहीच भानगडी?

पण लक्षात ठेवा...

पुरून उरेल सर्वांना

रांगडा राष्ट्रवादी गडी

फडणवीसांनी केले आरोप -

नवाब मलिकांनी काही दिवसांपूर्वी एनसीबीचे माजी अधिकारी नवाब मलिकांवर आरोप केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर देखील त्यांनी आरोप केले. मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्याच आरोपाचा ठपका ठेवत आज ईडीकडून नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT