Tushar Bhosale And Amol Mitkari esakal
महाराष्ट्र बातम्या

तुषार भोसलेंमुळे अजित पवारांचे देहुत भाषण झालं नाही - अमोल मिटकरी

'देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : तुषार भोसलेंमुळेच अजित पवार यांचे भाषण झाले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पाठवलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांची सही आहे. त्यामुळे हा नवीन वाद निर्माण झाला आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माफी मागावी, अशी मागणी मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. (Amol Mitkari Allegation On Tushar Bhosale Not Allowing For Speech At Dehu Of Pune)

देहू येथे १४ जून रोजी संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करु दिले गेले नाही, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावरुन राज्यात नवीन राजकीय वाद सुरु झाला आहे.

तुषार भोसले म्हणाले, की पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला टेंटीव्ह कार्यक्रम मागवला होता. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून देहूतील कार्यक्रमाला आले होते. तीन दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पवार यांचे नाव मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आले. त्यानंतर ते पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवले गेले, असे भोसले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT