Amol Mitkari
Amol Mitkari सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र

'देवेंद्र फडणवीसांना CM करण्याच्या भाजपच्या स्वप्नाला सुरुंग लागेल'

सकाळ डिजिटल टीम

'राज्यात सराकरा बरखास्त होण्याचा काही राजकीय भुंकप झाला तर आम्ही विरोधी पक्षात बसु'

सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. महाविकास आघाडी सरकार बरखास्त होईल अशा खासदार राऊतांच्या ट्विटमुळे तर्क वितर्क लावले जात आहेत. या सरकार बरखास्त होईल या बातमीनतंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. दरम्यान, सरकार बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे, या बातमीमुळे राष्ट्रवादीनेही आमदारांची बैठक घेतली आहे. उद्या पुन्हा शरद पवारांनी आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. (Maharashtra Politics)

या बैठकीसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोर मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या बैठकीत सरकार बरखास्त होण्यासंदर्भात चर्चा झाली नाही तर या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल यावर चर्चा झाली आहे. अशा अडचणीच्या काळात राष्ट्रवादी शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर विश्वास असल्याने आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, भाजपसोबत जाण्याचा प्रश्न येत नाही. राज्यात सराकरा बरखास्त होण्याचा काही राजकीय भुंकप झाला तर आम्ही विरोधी पक्षात बसु, हे याआधीही सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्यांच बहुमत सिद्ध होऊ शकत का यावर राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे दोन दिवस वेट अॅंड वॉच भूमिका घ्यावी. यावेळी त्यांनी केलेल्या ट्वीटसंदर्भात ते म्हणाले, तो एक गालिबचा शेर ट्वीट केला आहे. याचा अर्थ असा की, काही अशी सकंट असतात ती अनेकवेळा येत असतात. मात्र हे ही सकंट दुर होईल आणि भाजपाचे जे स्वप्न आहे, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचं त्याला सुरुंग लागेल, ते स्वप्न अपूर्ण राहिल, असं त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात अशा प्रकार राजकीय भुकंप यावा अशी भाजपाची इच्छा आहे. परंतु शरद पवार या राजकीय मैदानात आहेत तोपर्यंत भाजपाचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, मात्र राष्ट्रवादी पक्ष नात्याने महाविकास आघाडी सरकारसोबत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT