amravati chemist umesh kolhe murder case the accused carried out-the murder by taking only 10000 rupees  
महाराष्ट्र बातम्या

अमरावती प्रकरणात मोठा खुलासा; फक्त 10 हजारांच्या सुपारीवर झाली हत्या

सकाळ डिजिटल टीम

Umesh Kolhe Murder Case : अमरावती केमिस्ट उमेश कोल्हे याच्या खून प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 10 हजार रुपये घेऊन केमिस्ट उमेश कोल्हे यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी खासदार नवनीत राणा यांचे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी नुपूर शर्माचा अँगल समोर आला होता, मात्र हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने ते उघड झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी आठवा आरोपी शमीमही आमच्या रडारवर आहे. या प्रकरणातील आरोपींकडून दोन मोटारसायकली आणि तीन चायनीज चाकूही जप्त करण्यात आले आहेत. त्या म्हणाल्या की, आज किंवा उद्या आम्ही या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवत आहोत. उमेश कोल्हे यांच्या हत्येसाठी इरफानने पाच आरोपींना १० हजार रुपये आणि मोटारसायकल दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्या म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी मी आमदार रवी राणा यांच्यावर आयपीसी कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे खासदार नवनीत राणा माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. त्यांनी खासदार नवनीत राणा यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

तसेच त्यांनी सांगितले की, अशा पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शहरातील तीन जणांना धमक्या आल्या आहेत, मात्र त्यापैकी एकानेच तक्रार दिली असून दोन जण पुढे यायला तयार नाहीत. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर एक दिवसापूर्वी प्रकरण दडपल्याचा आरोप केला होता.

उमेश कोल्हे खून प्रकरणातील सातही आरोपींना अमरावती न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ४ दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आली. अमरावती पोलिसांनी सर्व आरोपींना ८ जुलै रोजी किंवा त्यापूर्वी एनआयएच्या मुंबई न्यायालयात हजर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT