amravati love jihad case  amravati police on girl left the house mp navneet rana
amravati love jihad case amravati police on girl left the house mp navneet rana  esakal
महाराष्ट्र

अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलगी सापडली पण...

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : अमरावतीमधील लव्ह जिहादच्या आरोप केला जात होता, या प्रकरणी आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा आरोप करत पोलिसांवरही आरोप केले होते. त्यानंतर बेपत्ता असलेल्या तरूणीचा अखेर शोध लागला आहे. हे प्रकरण दोन दिवसांपासून राज्यात गाजत असताना या मुलीच्या शोधाला यश आले. त्यानंतर पोलिसांनी या तरूणीला ताब्यात घेतलं. यानंतर आता ती मुलगी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पळून गेली होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे.

ती तरुणी मुलगी सुखरुप आहे, आज रात्रीपर्यंत अमरावतीमध्ये पोहोचणार असून ती अमरावतीमध्ये आल्यानंतर तिचा सविस्तर जबाब घेण्यात येईल अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तसेच घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या रागातून ती मुलगी घरातून एकटीच पळून गेली होती अशी माहिती देखील अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली आहे.

नेमकं काय प्रकरण आहे ते ती परत आल्यावर सविस्तर समजेल असे आरती सिंग म्हणाल्या, सध्या सातारा पोलिासांनी दिलल्या माहितीनुसार ती रागाच्या भरातून एकटी निघून गेली होती अशी माहिती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार खासदार अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला होता. सदर युवकांने तीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहसंस्थाला परवानगी नसताना या विवाह संस्थेने बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील उच्चशिक्षित हिंदू तरुणीला रुग्णवाहिका चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने प्रेम जाळ्यात अडकवून अमरावती येथे आणले. विजय कॉलनी स्थित महेश देशमुख यांच्या चंद्रविला चारिटेबल ट्रस्टकडून दोघांचे लग्न लावले होते. संबंधित संस्थेला आंतरधर्मीय विवाह लावण्याची परवानगी नाही. तरीही महेश देशमुख यांच्या संस्थेकडून बनावट मॅरेज सर्टिफिकेट देण्यात आल्याचे समोर आले होते.

नंतर या प्रकरणामध्ये खादार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. हिंदू तरुणींशी लग्न करून त्यांच धर्मांतरण केलं जातं तसेच त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला जात असल्याचा आरोप राणा यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT