महाराष्ट्र बातम्या

अमरावती हिंसाचार: आरोपी अनिल बोंडेंसह इतर भाजप नेत्यांना जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

अमरावती: : अमरावती बंदला हिंसक (Amravati violence) वळण लागल्यानंतर पोलिसांनी (Amravati police) गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह (Anil Bonde) महापौर चेतन गावंडे (Mayor Chetan Gawande) आणि भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय (BJP Leader Tushar Bhartiya) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलिसांनी अनिल बोंडेंवर अटकेची कारवाई केली होती. दंगल भडकावणे, दंगल भडकावण्यासाठी प्रवृत्त करणं अशा कलमांतर्गत अनिल बोंडेंसह इतर भाजप नेत्यांवर गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांच्यासह आता सभागृह नेते तुषार भारतीय, महापौर चेतन गावंडे यांना देखील जामीन मिळाला आहे.

शनिवारी भाजपने पुकारलेल्या बंदमध्ये हिंसा घडवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शनिवारी आंदोलन केलं होतं. त्या बंदमध्ये झालेल्या हिंसेला बोंडे जबाबदार असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. शनिवारी त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. त्यावेळी हिंसा देखील झाली होती. त्या हिंसेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंदने हिंसक वळण घेत अनेक दुकानाची तोडफोड करण्यात आली. तसेच काही दुकानांना आग लावण्यात आली. सर्वाधिक उपद्रव राजकमल चौक, नमुना परिसरात झाला.

शहर कोतवाली पोलिसांनी त्याप्रकरणी दोन्ही गटातील जमावाविरुद्ध जाळपोळ, दगडफेकप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले. तर खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेबारानंतर छत्रपुरी खिडकी परिसरात तीन व्यापारी प्रतिष्ठानांना काही उपद्रवींनी लक्ष केले. बंद प्रतिष्ठाने फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज लुटल्या गेला, असे खोलापुरीगेट पोलिसांनी सांगितले. त्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT