महाराष्ट्र बातम्या

देवेंद्रजी वेशांतर करून शिंदेंना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील १५ दिवसांच्या अनेक धक्कादायक घडामोडींनंतर राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सत्तांतर घडवून आणत सरकार स्थापन केलं. मात्र हे सत्तांतर काही एक दिवसांत झालेलं नाही. याबाबत आता नवनवीन खुलासे होत असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील भाषणात हे कसं घडल याची पुसटशी कल्पना दिली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सत्तास्थापनेपूर्वीच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Amruta Fadanvis revealed about Devendra Fadanvis-Eknath Shinde meeting)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्सक्लुजिव्ह मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांना भेटायला जाण्यासाठी देवेंद्रजी वेशांतर करून जायचे. शिवाय देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, हे देखील आपल्याला आधीच माहित होतं, असंही त्यांनी म्हटलं.

याआधी एकनाथ शिंदे यांनी देखील सभागृहातील बहुमत चाचणीनंतर केलेल्या दिलखुलास भाषणात सरकार स्थापनेसंदर्भातील अनेक गुपित गोष्टींचा उलगडा केला होता. शिंदे म्हणाले होते की, मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो. त्याचवेळी सत्तांतर काही एका दिवसात झालं नाही असंही ते म्हणाले होते.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. धक्कादायक म्हणजे दुसऱ्या दिवशीच महाविकास आघाडी सरकार अनिश्चिततेच्या गर्तेत गेले आणि अखेर भाजपने राज्यात एकनाथ शिंदेंच्या मदतीने सरकार स्थापन केलं. मात्र भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT