Amruta Fadnavis Attack on Uddhav Thackeray
Amruta Fadnavis Attack on Uddhav Thackeray e sakal
महाराष्ट्र

'वज़नदार ने हल्के को...', अमृता फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) वजनावरून टीका केली होती. फडणवीसांनी देखील रविवारी घेतलेल्या सभेत उद्धव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या दोन नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामध्ये आता फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी चारोळी शेअर करत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

''वजनदार (त्यांच्या मते देवेंद्र फडणवीस) व्यक्तीने हलक्या (अमृता यांच्या मते उद्धव ठाकरे) व्यक्तीला अतिशय हलकं वजन वापरून हलके केले. तुम्ही आधीच हलक्या वजनाचे होते आणि त्यांनी तुमचं वजन आणखी कमी केलंय'', अशा आशयाच्या हिंदीतील ओळी ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

अमृता फडणवीसांचा नेमकं ट्विट काय? -

वज़नदार ने हल्के को,

बस हल्के से ही वज़न से,

कल ‘हल्का’ कर दिया ...

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते? -

देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या सभेत बाबरी पाडण्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे होतो, असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांनी टीका केली. प्रत्येकजण अयोध्येला निघाला आहे. बाबरी मी पाडली म्हणतात. पण, देवेंद्रजी तुम्ही बाबरीवर पाय जरी ठेवला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती, अशी टोमणा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला होता.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? -

उद्धव ठाकरे म्हणाले होते, की बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती. पण, त्यांना सांगायचं आहे की, आज माझं वजन १०२ किलो आहे. बाबरी पाडायला गेलो त्यावेळी माझं वजन १२८ किलो होतं. त्यात लाजण्यासारखं काय आहे? मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसांची भाषा कळत नाही. त्यांना एफएसआयची भाषा कळते. सामान्य माणसाचा एफएसआय १ असेल तर आज माझा २ आहे. बाबरी पाडताना तो २.५ होता, असं जोरदार प्रत्युत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलं. तसेच बाबरी तर पाडली. पण, तुमच्या सत्तेचा ढाचा लवकरच पाडणार असल्याचा इशारा देखील फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

SCROLL FOR NEXT