Amruta Fadnavis Eknath Shinde Shrikant Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis : ब्लॅकमेल प्रकरणाशी श्रीकांत शिंदेंचा संबंध? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

किरीट भाऊंनी या प्रकरणाचा शोध घ्यावा असं आव्हानही सुषमा अंधारेंनी दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात सध्या दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. या प्रकरणावरुन राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचं कनेक्शन मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी जोडलंय.

सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त मुखेड इथं त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अंधारे यांनी गंभीर आरोप केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, "उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या. किरीट भाऊंनी याचा शोध घ्यावा. ज्या अनिल जयसिंघानीच्या नावाने आरोप केले जात आहेत. त्यांच्याच जागेत श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय कसं काय? ती जागा कोणाची, कोणाच्या नावावर आहे, त्याची खरेदी विक्रीची कागदपत्रं तपासा. जयसिंघानी यांची जवळीक कोणाशी? याचा तपास झालाच पाहिजे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT