amruta fadnavis devendra fadnavis style dialogue mi punha yein in in ahmednagar with  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadanvis : फडणवीसच काय, आता अमृता वहिनींचाही 'मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन'चा नारा

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांचे गायन असो वा राजकीय वक्तव्य कुठल्या ना कुठल्या कारणाने सत्तत चर्चेत असतात. आता पुन्हा एकादा त्या चर्चेत आल्या आहेत त्या ‘मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन’ हा देवेंद्र फडणवीसांच्या डायलॉगमुळे.. नेमकं काय घडलं वाचा..

आज अमृता फडणवीस या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावात महिला बचत गट कर्ज वाटप, महिलांसाठी जिमचा शुभारंभ यासह विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित होत्या. यावेळी भाषणाचा शेवट करताना त्यांनी तो प्रसिध्द डायलॉग ऐकवला.

प्रवरा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थीनिंशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी विद्यार्थीनिंच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. एका विद्यार्थीनीने जीवनातील सर्वात अवघड प्रसंगाबद्दल विचारले असता, मुलगी तीन महिन्याची असताना कामावर रुजू व्हावं लागलं हा अवघड क्षण होता असंही सांगितलं.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

या कार्यक्रमात केलेल्या भाषणात अमृता फडणवीस म्हणाल्या, “भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायचं आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. ‘मेक इन इंडिया’ मोदींचं स्वप्न आहे. हे स्वप्न तेव्हाच साकार होईल, जेव्हा प्रत्येक स्त्री यामध्ये योगदान देईल. आपण सगळे मिळून भारतासाठी हे स्वप्न साकार करू, हे मला ठाऊक आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचं कुटुंब समाधानी राहील त्यापुढं तुमचं शहर, संपूर्ण भारत राहील.” एवढं सांगून मी माझे चार शब्द संपवते.

पुढे त्या म्हणाल्या की, “मला या कार्यक्रमात पुन्हा यायचं आहे. मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… कारण यावेळी मला तेवढी मजा आली नाही. खूप काही करायला होतं, तेवढा वेळ घालवता आला नाही. आता मी जातेय पण मी पुन्हा येईन…”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT