Amruta Fadnavis
Amruta Fadnavis 
महाराष्ट्र

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनर विरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केली आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे. (Amruta Fadnavis files FIR against designer offering Rs 1 crore )

मिळालेल्या माहितीनुसार, अमृता फडणवीसांनी अनिक्षा या नावाच्या डिझायनर विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. यामध्ये धमकावणे, कट रचणे आणि लाच ऑफर करणे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CM शिंदेंनी मागवलेत तीन जाडजूड बांबू; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा, काय आहे कारण?

मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये 20 फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने फडणवीस यांच्या निवासस्थानी अनेकवेळा भेट दिली होती.

एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल 1 कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती.

Earthquake : भूकंपानं न्यूझीलंडची धरती हादरली; कर्माडेक बेटावर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप, सुनामीचा इशारा

एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्शाने तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक मेसेज एका अज्ञात फोन नंबरवरुन पाठवण्यात आले. तसेच डीझायनर धमकावण्याचा प्रयत्न करत होती.

H3N2 Virus : राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

अनिक्षा या डिझायनरसोबत तिच्या वडिलांविरोधात फडणवीस यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कलम 8 भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्ग वापरण्याशी संबंधित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT