Amruta Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

वाईट नेते मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही; अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे पुन्हा वाद

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - शिवसेना आणि अमृता फडणवीस यांच्यातला वाद पुन्हा पेटण्याची शक्‍यता आहे. ऍक्‍सिस बॅंकेतली खाती राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये वळती करण्याच्या मुद्द्यावरून अमृता फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्याला वाईट नेते मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, असे ट्‌विट अमृता फडणवीसांनी केले आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी एका दैनिकाला मुलाखतीत दिली होती. ऍक्‍सिस बॅंकेतून वळत्या केल्या जाणाऱ्या खात्यांबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. सरकारच्या निर्णयाचा सर्वसामान्यांवर परिणाम होत असेल तर शांत बसणार नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. नव्या सरकारने ऍक्‍सिस बॅंकेतील महाराष्ट्र पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्‌स राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे वळविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सध्या पोलिस खात्यातील 2 लाख कर्मचाऱ्यांचे वेतन खाते ऍक्‍सिस बॅंकेत आहेत. पोलिसांच्या खात्यातून ऍक्‍सिस बॅंकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते.

मात्र, हे पोलिस खातेदार ऍक्‍सिस बॅंकेला गमवावे लागू शकतात, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे हा घटनाक्रम शिवसेना आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि अमृता फडणवीस यांच्यातील शाब्दिक युद्धानंतर घडला आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार आहे, त्यानंतर ठाकरे सरकारकडून ऍक्‍सिस बॅंकेतून पोलिसांची खाती वळविण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ऍक्‍सिस बॅंकेत उप-संचालक पदावर कार्यरत आहेत. फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून पोलिसांचे वेतन खाते ऍक्‍सिस बॅंकेत वळविल्याचा आरोप नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी केला आहे. यासंबंधीची तक्रारही त्यांनी ईडीकडे दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT