Nawab Malik, Amruta Fadnavis Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वीच अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या...

अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा नवाब मलिकांवर निशाणा साधला.

सुधीर काकडे

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादाची चर्चा सुरू आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांमुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. नवाब मलिक हे वेगवेळ्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून रोज समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसता आहेत. त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बॉम्बस्फोटाशी संबंधीत लोकांशी नवाब मलिकांनी व्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधत उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला. त्याला अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सायंकाळी एक ट्विट करत या वादात उडी घेतली आहे.

क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाई प्रश्न उपस्थित करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यातच त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर देखील आरोप केले होते. अमृता फडणवीस आणि मंत्री मलिक यांच्यात शाब्दीक चकमक झाली होती. आज फडणवीस यांनी नवाब मलिकांवर आरोप केल्यानंतर मलिक यांनी उद्या आपण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा या वादात उडी घेत, मलिक यांच्या कथित 'हायड्रोजन बॉम्ब'पुर्वीच त्यांच्यावर टीका केली आहे. "बिगड़े नवाब यांनी प्रेस कॉन्फरन्सवर, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि प्रत्येक वेळी खोट्या गोष्टी सांगितल्या. तसेच यांचं लक्ष्य फक्त आपल्या जावयाला आणि काळ्या पैशाला वाचवणे हेच आहे", असे म्हणत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी घेतलेल्या वेगवेळ्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी ड्रग्जशी संबंधीत असलेल्या एका व्यक्तीसोबत उभ्या असलेल्या अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर करत त्यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : निवडणूक आयोगाने शिवसेनेला पक्षात अंतर्गत लोकशाही आणण्याचे निर्देश दिल्यानंतर पक्षाने आपल्या राज्यघटनेत सुधारणा केली होती - सिब्बल

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

'तुला खूप मिळाले असतील मला एकच...' नाना पाटेकर माधुरी दीक्षितला म्हणालेले...

Zeeshan Siddique Death Threat : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आमदार झिशान सिद्दीकींना धमकी 'वडिलांच्या हत्येच्या वेळी नशिबाने वाचलास, आता...'

Koyna Water Project : कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च! वाशिष्ठीत वाया जाणारे पाणी मुंबईची भागवणार तहान? कोयनाच्या अवजलावर डोळा?

SCROLL FOR NEXT