Amruta Fadnavis Attacked on uddhav thackeray Amruta Fadnavis Attacked on uddhav thackeray
महाराष्ट्र बातम्या

उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? अमृता फडणवीसांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा देणाऱ्या आमदार रवी राणा (Ravi Rana) व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. माफी मागितल्याशिवाय घराबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी दिली. यावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले. (Amruta Fadnavis Attacked on uddhav thackeray)

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी २४ एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर दोन दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण झाला होता. तसेच शिवसैनिक आक्रमक झाले होते. रवी राणा यांच्या घराबाहेर आणि मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

यानंतर पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आंदोलन मागे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा रवी राणा यांनी केली. यावर संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली होती. शिवसेनेच्या नादाला लागाल तर २० फूट खाली गाडले जाल असे संजय राऊत म्हणाले होते.

त्यांच्या विधानाचा विरोधकांनी चांगलाच विरोध केला. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली जाते, पण त्याची साधी दखलंही घेतली जात नाही. सरकार सोयीस्करपणे गप्प का आहे, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता. आता अमृता फडणवीस यांनी ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट करून सरकारला प्रश्न विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT