Article about trolling to amruta fadnavis on social media 
महाराष्ट्र बातम्या

महाशिवरात्रीला अमृता फडणवीसांंचं नवं गाणं येणार,भाजपच्या कार्यक्रमात घोषणा

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आज मुंबईत भाजपच्या कॅन्सरमुक्त अभियानाच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाशिवरात्रीला नवा गाण्याचा अल्बम प्रसिद्ध करणार असल्याचं सांगितलं. तर, मुंबईच्या ट्रॅफिवरही टीका केली. (Amruta Fadnavis Songs)

अमृता फडणवीस स्वत: बँकर आहेत. त्या पार्श्वगायनही करतात. फडणवीस यांचे अनेक अल्बम याआधी प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे चाहते कायम गाण्याची वाट पाहात असतात. या चाहत्यांना आता आणखी एक पर्वणी मिळणार आहे. मुंबईत भाजपने कॅन्सर दिनानिमित्त कार्यक्रम घेतला होता. यावेळी अमृता फडणवीस यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मुंबईतील समस्यांवर भाष्य केलं. मुंबईतील ट्रॅफिकमुळे ३ टक्के लोकांचे घटस्फोट होत असल्याची माहिती अमृता यांनी दिली. यासोबत त्यांनी नव्या अल्बमचीही घोषणा केली.

'तिला जगू द्या', 'गणपती साँग' आणि आता 'शिवतांडव'

येत्या महाशिवरात्रीपर्यंत नवा मुझिक अल्बम घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 'शिवतांडव' नावाने त्या गाणं येणार असल्याची चर्चा आहे. याआधी अमृता फडणवीसांनी अनेक गाण्याचे अल्बम काढले आहेत. फडणवीस यांचं गणपतीवर गाणं आलं होतं. यानंतर 'तीला जगू द्या', हे तरुणींवरील अत्याचाराला वाचा फोडणारं गाणंही हीट झालं. तर, देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांनी राज्यातील नद्यांवरही गाणं गायलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिग अलर्ट! या तारखेपासून सुरू होणार Flipkart Big Billion Days सेल; iPhone वर मोठ्या डिस्काउंटची शक्यता

Chief Sports Executive Officer : आदिती स्‍वामी बनली मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Kolhapur 10 Km Flyover : तावडे हॉटेल ते गगनबावडा रस्‍त्‍यावर 13 हेक्टर जमिनीचे होणार संपादन, 2000 कोटी खर्च होणार; केंद्र सरकारला 15 दिवसांत उड्डाणपुलाचा प्रस्ताव!

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

बापरे! पूनम धिल्लो अन् पद्मिनी कोल्हापुरेंविरोधात अभिनेत्रीची पोलीस तक्रार; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT