sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

"...तर पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांवरील अन्याय दूर करावा" - आनंद दवे

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी शरद पवारांना टोला लावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास लेखनात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. पुरंदरे यांनी त्यांच्या लेखनात महाराजांवर जेवढा अन्याय केला आहे, तेवढा अन्याय अन्य कोणत्याही लेखकाने केला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केला आहे. त्यानंतर शरद पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांवरील अन्याय दूर करावा असा टोला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी लावला आहे.

(Anand Dave On NCP Sharad Pawar)

"बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास लिहिताना महाराजांवर अन्याय केला हे पवार यांचे वक्तव्य केवळ चुकीचं नसून निंदनीय आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे कारण याआधी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केल्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. शरद पवार हे इतिहासकार नाहीत असा टोला दवे यांनी लावला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी इतिहासाचा अभ्यास नसताना फक्त जातीचे राजकारण करत पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे यांना सक्रिय करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी पुरंदरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. पवार हे इतिहासकार नाहीत, ते जातीचं राजकारण करत आहेत हे चुकीचं आहे. जर पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासाने शिवाजी महाराजांवर अन्याय झाला असं पवारांना वाटत असेल तर त्यांनी शिवचरित्र लिहून महाराजांवरील अन्याय दूर करावा असा टोला दवे यांनी पवारांवर लावला आहे.

काय म्हणाले होते पवार?

"दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि वास्तववादी इतिहास लिहिला नाही. त्यांनी त्यांच्या लेखनात शिवाजी महाराजांवर कायम अन्याय केला आहे. दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु नव्हते तरी पुरंदरेंनी त्यांच्या इतिहासात याचा उल्लेख केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याची गरज आहे. यासाठी नवीन पिढीतील इतिहास तज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे." असं शरद पवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT