Anand Mahindra esakal
महाराष्ट्र बातम्या

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर वाघ; आनंद महिंद्रांनी शेअर केला थरारक VIDEO

सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांच्या डोंगररांगांत अनेक दुर्मिळ प्राणी आढळतात

बाळकृष्ण मधाळे

सातारा : सध्या सोशल नेटवर्कींगचा वापर अनेकांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कोणतीही एखादी पोस्ट अथवा व्हिडिओ याच मधून 'शेअर' करण्याचे प्रमाण वाढलेय. मोठे-मोठे दिग्गजही आता सोशल नेटवर्कींगवर 'अॅटिव्ह' असल्याचे चित्र आहे. सध्या प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर 'अॅटिव्ह' असणारे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नुकताच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अंकाउंटवर शेअर केला असून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

महाबळेश्वरजवळच्या पाचगणीमध्ये खरंच रस्त्यावर वाघ फिरत आहेत का?, याची नेटकऱ्यांना उत्सुकता लागून राहिलीय.

नेहमी चर्चेत असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी रविवारी सायंकाळी आपल्या ट्विटरवर महाबळेश्वरजवळच्या पाचगणीमध्ये रस्त्यावर (Mahabaleshwar-Panchgani Road) दोन वाघ (Tiger) दिसल्याचा दावा करत एक व्हिडिओ शेअर केलाय. तो शेअर करतानाच, महिंद्रांनी त्या व्हिडिओला एक मजेशीर कॅप्शन देखील दिलंय. '..तर हायवेवर केवळ आमची एक्सयूव्ही ही एकमेव बिग कॅट नाहीय. भन्नाट आहे हे..' अशा कॅप्शनसहीत महिंद्रांनी हा व्हिडिओ शेअर केल्याने त्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. त्यामुळे महाबळेश्वरजवळच्या पाचगणीमध्ये खरंच रस्त्यावर वाघ फिरत आहेत का?, याची देखील नेटकऱ्यांना उत्सुकता लागून राहिलीय.

या व्हिडिओमध्ये हे वाघ १९ ऑगस्ट २०२१ रोजी पाचगणीजवळच्या मार्गावर रात्रीच्या वेळी दिसल्याचं सांगण्यात आलंय. व्हिडिओत आधी एक वाघ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून बाहेर रस्त्यावर येतो. त्यानंतर लगेचच तो दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या बाईकपर्यंत येऊन पुन्हा जिथून तो बाहेर आलेला त्या दिशेने जातो. दरम्यान, पहिला वाघ आला तिथूनच दुसरा एक मोठा वाघ बाहेर येतो. त्यामुळे दोन वाघ पाहताच, ज्या गाडीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय, त्या गाडीतील प्रवासी प्रचंड घाबरतात आणि गाडी मागे घ्या मागे, असं चालकाला सांगू लागतात. परंतु, चालक त्या प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन करतो, त्यांना गप्प करतो. प्रवाशी शांत राहताच हे वाघ देखील पुन्हा जंगलामध्ये माघारी फिरतात. महाबळेश्वर-पाचगणी पट्ट्यात अनेकदा आपल्याला बिबट्यासह वाघ दिसून येतात. येथूनच जवळ चांदोली राष्ट्रीय उद्यान (Chandoli National Park) आहे. शिवाय, येथे कोयना वन्यजीव अभयारण (Koyna Sanctuary) देखील आहे. या पट्ट्यात वाघाबरोबरच बिबट्या, गवा, सांबर, हरीण, साळिंदर, लांडगा इत्यादी प्राणी देखील पाहायला मिळतात.

सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी आढळतात. त्यामुळे जंगल पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण आहे. हा संपूर्ण पट्टा वनसंपदेने अच्छादल्याने येथे मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा वावर पहायला मिळतो. त्यातच महिंद्रांनी एक व्हिडिओ शेअर केल्याने खरंच महाबळेश्वरजवळच्या पाचगणीत वाघ फिरत आहेत का?, याबाबत उत्सुकता लागून राहिलीय. मात्र, नेटकरी महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडिओचा आनंद घेताना दिसताहेत, तर काहीजण हा व्हिडिओ पाचगणीतील नसल्याचे बोलत असून तो एक वर्षापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba Tiger Project) असल्याचे बोलताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT