Dattray Lohar esakal
महाराष्ट्र बातम्या

देवराष्ट्रेचा दत्तात्रय पाहतोय महिंद्रा' यांच्या बोलेरोची वाट

महिंद्रा कंपनीतून अजूनपर्यत काही संपर्क झाला नाही असेही त्यांनी सांगितले.

स्वप्नील पवार

देवराष्ट्रे (कडेगाव) : काही दिवसापूर्वी देवराष्ट्रेच्या (Devarashtre) दत्तात्रय लोहार यांनी मिनी जिप्सी तयार केली. याचे कौतुक सोशल मीडियावर तर झालेच शिवाय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील दखल घेतली. या कारागिराने बनवलेल्या गाडीच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो गाडी देईन व त्यांची गाडी कंपनीच्या रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शनास ठेवीन, असे ट्विट करत दत्तात्रय लोहार यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली आहे. मात्र सोशल माडियावर त्यांनी ही आॅफर नाकारल्याची अफवा पसरत आहे. यामागे नेमके कोणते सत्य आहे हे दैनिक सकाळ शी बोलताना दत्तात्रय (Dattray Lohar)यांनी सांगितले आहे.

दत्तात्रय म्हणाले , आनंद महिंद्रा यांनी बोलेरो देतो असे ट्विट केले. परंतु अजून कोणताही संपर्क नाही. त्यांनी मोठ्या मनाने दिलेली ऑफर मी नाकारली नाही. त्यांनी माझ्या कलेची दाद घेतल्याबद्दल मी आनंद महिंद्रा यांचा आभारी आहे.

दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे.आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रयने गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले. त्याला कुटुंबातील सर्वांची मोलाची साथ लाभली. विशेष बाब म्हणजे दत्तात्रय हा शाळा शिकलेला नाही. परंतु त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे तो ही गाडी तयार करू शकला. मिनी जिप्सी मुळे दत्तात्रय व त्यांच्या कुटुंबावर सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे. कृषि राज्यमंत्री यांनी दत्तात्रय याला लागेल ती मदत ट्रस्टच्या माध्यमातून देणार असल्याचे सांगितले आहे. त्याला रोज राज्यातून हजारो फोन येत आहेत. मात्र महिंद्रा कंपनीतून अजूनपर्यत काही संपर्क झाला नाही असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

Marathi News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीतील 'बारापुल्ला फेज-३' कॉरिडॉरचे उद्घाटन

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT