Anandraj Ambedkar News  esakal
महाराष्ट्र बातम्या

बाबासाहेबांचा 'तो' पुतळा उभा राहिला, तर त्याला विरोध करु; आनंदराज आंबेडकरांचा थेट इशारा

ऐतिहासिक कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भीम अनुयायी येत असतात.

सकाळ डिजिटल टीम

ऐतिहासिक कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भीम अनुयायी येत असतात.

Anandraj Ambedkar News : ऐतिहासिक कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथं विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भीम अनुयायी येत असतात. त्यामुळं यंदा येथील कार्यक्रम निर्बंध मुक्त व्हावेत. 1 जानेवारी 2023 रोजीच्या कार्यक्रमांमध्ये निर्बंध शिथिल करावेत, अशी आग्रही मागणी आनंदराज आंबेडकर यांनी सरकारकडं केलीय.

माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, 'लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमा इथं येत असतात. 2 वर्षे या कार्यक्रमावर निर्बंध होते. पण, सरकारनं यावर्षी हे निर्बंध लावू नयेत. या ऐतिहासिक विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी गाड्यांची संख्याही मोठी असते. मात्र, बऱ्याच जणांना तिथं चालत जावं लागतं. या विषयीही निर्णय झाले पाहिजेत. इथं वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सरकारनं नियोजित जागा द्यावी.'

कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील इंदू मिलमध्ये (Indu Mill Mumbai) आले होते. इंदू मिलमध्ये जो पुतळा उभा करण्यात येणार आहे, त्यात दुरुस्ती आणि काही त्रुटी आहेत. जो डमी पुतळा बनण्यात आला आहे, तो बाबासाहेबांच्या चेहऱ्यासारखा दिसत नाहीये. यात हाताची ठेवण वेगळी आहे. बाबासाहेबांचा सर्वात सुंदर पुतळा मुंबईतील मंत्रालयासमोर आहे. या सारखाच पुतळा व्हायला हवा. सध्याचा बाबासाहेबांचा डमी पुतळा आहे, तो फायनल करू नये. जर हाच पुतळा उभा राहिला गेला तर त्याला विरोध होईल, असा इशारा त्यांनी दिलाय. इंदू मिलसाठी मी खारीचा वाटा उचलला आहे, असंही आनंदराज आंबेडकर यांनी आवर्जुन सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT