anandraj ambedkar quits vanchit bahujan aghadi 
महाराष्ट्र बातम्या

वंचित आघाडीला मोठा धक्का; आंबेडकर बाहेर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून आनंदराज आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देणार आहेत. रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन कार्यक्रमात याबाबतची ते घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दादर येथील आंबेडकर भवनात रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून वंचितमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन सेनेत येण्यासाठी ते अवाहन करणार आहेत.

आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी वंचितला सोडचिठ्ठी देण्याबाबतचा निर्णय घेणे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी हा लोकसभा निवडणुकीपासून तिसरा पर्याय समोर येत असतानाच एकामागोमाग वंचित आघाडीला धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठी मते मिळवलेल्या वंचित आघाडीतून विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा महत्वाचा घटक पक्ष एमआयएम बाहेर पडला. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत पाहावे तशे यश मिळाले नाही. त्यांनंतर आनंदराज आंबेडकरांनी सोडचिठ्ठी देणे हा वंचित आघाडीसाठी मोठा झटका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

Navi Mumbai: 'त्या' गोष्टीमुळे नैराश्य, तरूणीची खाडीत उडी, धक्कादायक कारण समोर; Video Viral

काही तासांपूर्वी शेअर केली रील, मेसेजला रिप्लायही दिला; राहत्या घरी मिळाला प्रसिद्ध रीलस्टारचा मृतदेह

Latest Marathi News Live Update : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणा

एका चुकीमुळे सुंदरा फेम अभिनेत्रीने गमावलेले सगळे प्रोजेक्ट्स ; "मी दिवसभर अनेक स्टुडिओ पालथे घातले"

SCROLL FOR NEXT