andheri bypoll result bjp ashish shelar reaction on rutuja latke won shivsena uddhav thackeray faction  sakal
महाराष्ट्र बातम्या

Andheri Bypoll Result: आघाडीमुळे नव्हे, तर भाजपमुळे ऋतुजा लटकेंचा विजय; आशिष शेलारांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. दरम्यान या निकालानंतर (Andheri Bypoll Result) भाजपकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच ऋतुजा लटके यांचा विजय भाजपमुळे झाला असल्याचे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले आहेत.

या निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा 53 हजार 471 मताधिक्याने विजय झाला. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना सुरूवातीला उमेदवारी देण्यात आली होती, मात्र भाजपने या पोटनिवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे की, "भाजपाच्या मदतीमुळे मा. ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय..ऋतुजाताईंचे अभिनंदन!! काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप यासह डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता!"

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यापैकी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मते मिळाली तर, नोटा या पर्यायाला 12 हजार 776 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार बाळा नाडर यांना 1506 मते मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT