महाराष्ट्र बातम्या

Andheri East Bypoll Election: भाजपची खेळी यशस्वी? अंधेरी पोटनिवडणुकीत अनेकांची नोटाला पसंती

अंधेरी विधानसभा निवडणुकीआधी आणि दरम्यानच्या काळात झालेला नोटाचा प्रचार

अंकिता खाणे (Ankita Khane)

अंधेरी पोटनिवडणुकीमधून भाजपने माघार घेतल्यानंतरही ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सोपा नसल्याचे सातत्याने बोललं जातं आहे. याचं कारण म्हणजे अंधेरी विधानसभा निवडणुकीआधी आणि दरम्यानच्या काळात झालेला नोटाचा प्रचार. यासंबधीच्या काही कथित ऑडिओ क्लिप्सही मध्यंतरी समोर आल्या होत्या. यासंबधित तक्रारीही ठाकरे गटाने निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली होती. ठाकरे गटाने नोटाचा प्रचार करणाऱ्यांच्या क्लिप्सही निवडणूक आयोग आणि पोलिसांना दिल्या होत्या. दरम्यान ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके 58875 इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.तर नोटाला 11569 इतकी मत मिळाली आहे.

निवडणूक होण्याआधी याबद्दल चर्चा दिसून आल्या पण त्याचा प्रत्यय आता मतमोजणी दरम्यान दिसून येत आहे. मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या पार पडल्या. दरम्यान 15 व्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 55946 मते होती तर 10906 मते नोटाला मिळाली होती. या प्रत्येक फेरीअंती ऋतुजा लटके यांना सर्वाधिक मते दिसून आली तर दुसऱ्या नंबरवर दिसून आले ते नोटा. तसं पाहायला गेलं तर ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशी नाही तर ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशीच लढत पाहायला मिळाली आहे.

भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. मुरजी पटेलांच्या माघारीनंतर ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी खेळली. यासंबधित एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये ठाकरे गटाविरोधात ‘नोटा’च्या बटणाचा प्लॅन बनवला जात असल्याचा दावा केला जात होता.

अंधेरी पूर्वचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून या निवडणुकीसाठी जोर लावण्यात आला होता. तर, दुसरीकडे भाजपने या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अचानकपणे त्यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पटेल समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातही घोषणाबाजी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT