महाराष्ट्र बातम्या

आदित्यजींचं लवकर शुभमंगल होवो; अनिल बोंडेंनी दिल्या शुभेच्छा!

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर असून, आदित्यजींचं लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखी सूनबाई आम्हाला मिळो अशी इच्छा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे. (BJP ANil Bonde On Aditya Thackeray Marriage)

बोंडे म्हणाले की, ही अतिशय चांगली गोष्ट आहे की, आदित्य ठाकरे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेले आहेत. मी ज्यावेळी सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गेलो होतो, त्यावेळी सीतामाई सारखी सूनबाई आम्हाला मिळो आदित्याजींचं लवकर शुभमंगल होवो अशी इच्छा व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

अयोध्येत उभारणार 'महाराष्ट्र सदन'; आदित्य ठाकरेंची घोषणा

दरम्यान, अयोध्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी इथं एक महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

हा दौरा तीर्थयात्रा असून राजकीय यात्रा नसल्याचेही अदित्य यांनी स्पष्ट केलं. यासाठी उद्धव ठाकरे स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोलणार असल्याचे ते म्हणाले. सुमारे १०० खोल्यांचं प्रशस्त सदन या ठिकाणी आपण करणार आहोत. महाराष्ट्रात अनेक भाविक इथं येत असतात त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा आपल्याला इथं निर्माण करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT