Anil Deshmukh on Parambir Singh esakal
महाराष्ट्र बातम्या

'परमसत्य! परमबीर यांनी...', देशमुखांची चांदीवाल आयोगाला माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अँटिलिया स्फोटके प्रकरण (Antilia Bomb Scare) आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) महाराष्ट्र सरकारची दिशाभूल करत होते, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashta Former Home Minister Anil Deshmukh) यांनी चांदीवाल आयोगाला सांगितले. देशमुखांनी चांदीवाल आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यामध्ये हे 'परमसत्य' असल्याचं म्हटलं आहे.

25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. ठाणे येथील कार डीलर मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्रा खाडीत सापडला होता. 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घर अँटिलियाजवळ सापडलेली स्कॉर्पिओ हिरेन यांची होती, त्यात जिलेटिनच्या कांड्या होत्या. याप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती.

अनिल देशमुखांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी आयोगाला सांगितले, की त्यांना महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तयार केलेली कागदपत्रे हवी आहेत. त्यांनी काही कागदपत्रे गोळा केली होती. ती मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोर सादर केली आहेत. त्यामध्ये संपूर्ण सत्य आहे, असं कुलकर्णी म्हणाले. तसेच देशमुखांना विचारणा केली असता, ''मी गृहमंत्री असताना एटीएसने काही कागदपत्रे गोळा केली होती. त्यामध्ये परमबीर हे महाराष्ट्र सरकारची दिशाभूल करत असल्याचे पुरावे आहेत. ते कधीतरी रेकॉर्डवर आणायला पाहिजे'', असं देशमुख म्हणाले.

''एटीएसच्या तपासामुळे परबमीर सिंह यांची महाराष्ट्र सरकारने सरकारने होमगार्ड महासंचालनालयाच्या पदावर बदली केली. त्यानंतर त्यांनी 20 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. परमबीर यांनी बदला म्हणून पत्र लिहिले'', असंही यामध्ये म्हटलं आहे. मात्र, या प्रतिज्ञापत्रावर परमबीर यांचे वकील अनुकूल सेठ यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर चांदीवाल आयोगाने या अर्जातील काही गोष्टी बदलण्यास सांगितल्या. तसेच सचिन वाझेच्या वकिलाने देखील या अर्जावर आक्षेप घेतला. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ फेब्रुवारीला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT