Anil Deshmukh sakal media
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुखांचे खासगी सचिव व स्वीय सहाय्यकाविरोधात आरोपपत्र

अनिष पाटील

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil dehmukh) यांचे स्वीय सहाय्यक (personal assistant) कुंदन शिंदे (kundan shinde) व खासगी सचिव (private secretary) संजीव पालांडे (sanjiv palande) यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (enforcement directorate) सोमवारी आरोपपत्र (charge sheet) दाखल केले. देशमुख यांनाही याप्रकरणी पाच वेळा समन्स (summons) पाठवले आहे.

पालांडे व शिंदे या दोघांनाही मनी लाँडरींगप्रकरणात 26 जूनला ईडीने अटक केली होती. सर्व व्यवहार सुरळीत चालण्यासाठी 60 बार मालकांच्या वतीने महेश शेट्टी व जया पुजारी यांनी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला डिसेंबर 2020 मध्ये गुडलक मनी म्हणून 40 लाख रुपये दिले होते. याशिवाय परिमंडळ 1 ते 7 मधील ऑक्रेस्ट्रा बारमधील जानेवारी, फेब्रुवारी 2021 मध्ये एक कोटी 64 लाख रुपये वाझेला दिले होते. परिमंडळ 8 ते 12 मधील ऑर्क्रेस्ट्रा मालकांनी दोन कोटी 66 लाख रुपये वाझेला याच कालावधीत दिले होते.

बार मालकांना दिलेला पैसा नंबर 1 व क्राईम ब्रांच मधील समाज सेवा शाखेला जात असल्याचे बार मालकांना सांगितले होते. वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजीत करून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये चार कोटी 70 लाख रुपये जमा केले. ही रक्कम देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला दोन हफ्त्यांमध्ये जानेवारी व फेब्रुवारी 2021 या कालावधीत दिली, असा दावा वाझेने केला होता. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्था याच्या खात्यावर चार कोटी 18 लाख रुपये जमा झाले होते.

ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. बार मालकांकडून घेतलेली 4 कोटी 70 लाखांची ही तीच रक्कम असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्या मार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवाला मार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे. ही रक्कम कुंदन शिंदेने वाझेकडून घेतली होती, असा दावाही ईडीकडून करण्यात आला होता.

कुंदन शिंदे यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझेला 1 मार्च पूर्वी ओळखत नसल्याचे शिंदे यांनी ईडीला सांगितले आहे. तर पालांडे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात 4 मार्चला त्याची पोलिस अधिका-यांसोबत बैठक झाली. त्यात कोविड काळात बारवर लागू करण्यात आलेल्या नियम याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले होते. याबाबत ईडीने केल्या दाव्यानुसार, देशमुख यांचा पोलिसांच्या बदल्यांमध्ये विशेष करून आयपीएस अधिका-यांच्या बदल्यांमध्ये सहभाग होता, असा जबाब पालांडे याने दिला होता. याप्रकरणी देशमुख व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत 4 कोटी 20 लाखांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. आतापर्यंत याप्रकरणी देशमुख यांना ईडीने पाचवेळा समन्स बजावले आहे. पण प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित न राहता देशमुख यांनी वकिला मार्फत ईडीला उत्तर दिले आहे. तसेच देशमुख यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत आपण याप्रकरणी कायदेशीर लढाई लढत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT