Anil Deshmukh sakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख गौप्यस्फोट | परमबीर माझ्यासमोर थरथर कापत होते

माजी गृहमंत्री देशमुख यांचा चांदिवाल आयोगासमोर गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘ ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार सापडल्या प्रकरणी माहिती देत असताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे थरथर कापत होते.’’ असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. परमबीर यांनी देशमुखांवर कथित खंडणीबाबत केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती नेमली आहे. या समितीसमोर देशमुखांना आज हजर करण्यात आले. या समितीसमोर बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे वकील योगेश नायडू यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना देशमुखांनी धक्कादायक खुलासे केले.

‘अँटिलिया’ प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून ‘एटीएस’कडे हस्तांतरित करू नये, अशी परमबीरसिंह यांची इच्छा होती, असा दावाही देशमुखांनी केला. देशमुख म्हणाले की, ‘‘ अँटिलिया प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्याची सूचना त्यावेळी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांनी केला होती. परमबीरसिंहांनी त्याला विरोध करून तो मुंबई पोलिसांनीच तपास करावा अशी भूमिका घेतली होती. मी हे प्रकरण ६ मार्च २०२१ रोजी एटीएसकडे दिले होते यानंतर गुन्हे गुप्तवार्ता विभागातून मी सचिन वाझे यांची हकालपट्टी केली होती.’’

''मी तीन अतिरिक्त सचिवांच्या उपस्थितीत परमबीरसिंह यांना फोन केला होता. ‘अँटिलिया’ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात तुम्ही सरकारला अंधारात कसे ठेवू शकता? अशी विचारणा मी केली होती. मी प्रश्न विचारताच ते थरथर कापू लागले होते.''

- अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

Pune Traffic: बाबा भिडे पूल २२ जून ते ६ जुलैपर्यंत पूर्ण बंद; डेक्कन मेट्रो पादचारी केबल पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग जाहीर

Pesarattu Recipe: प्रोटीनने भरपूर, चवीला जबरदस्त! आंध्र प्रदेशचा लोकप्रिय नाश्ता पेसरट्टू; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा ट्राय कराल

SCROLL FOR NEXT